गेल्या आठवडय़ात न्यायालयाने फटकारल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड, लातूर व िहगोली या तीन लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. सोमवारी (दि. २७) होणाऱ्या या मेळाव्यासंदर्भात पक्षपातळीवरून कोणत्याही सूचना नाहीत, शिवाय िहगोलीची जागा सध्या तरी राष्ट्रवादीकडे आहे.
‘आदर्श’ प्रकरणात राज्य सरकारने अहवाल फेटाळल्यानंतर अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला होता. पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अहवाल फेटाळल्याबाबत नापसंती व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने हा अहवाल पुन्हा अंशत स्वीकारला. राज्यपालांनी सीबीआयला दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी नाकारल्यानंतर चव्हाण व समर्थकांना दिलासा मिळाला असला, तरी न्यायालयाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्याने त्यांचे अवसान गळाले होते.
देशात सध्या निवडणुकांचे वारे आहेत. मात्र, काँग्रेसकडून चव्हाण यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविलेली नाही. पक्षपातळीवर त्यांना अजूनही दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने फटकारल्यानंतर चव्हाण यांनी स्वतचे अस्तित्व टिकविण्यासाठी िहगोली, लातूर व नांदेड लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. िहगोली, लातूर मतदारसंघांत नांदेडचा काही भाग आहे. पण िहगोली मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई-दिल्लीतच तळ ठोकणारे चव्हाण गेल्या पाच-सहा दिवसांपासून नांदेडातच आहेत. वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ करताना त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीत नाराजीचा फटका बसू शकतो, असे गृहीत धरून दिल्लीत उरले-सुरले वजन कमी होऊ नये, या साठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. आता तीन लोकसभा मतदारसंघांतल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लातूरचे आमदार दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, िहगोलीचे आमदार राजीव सातव, भाऊ पाटील गोरेगावकर यांना मेळाव्यास निमंत्रित केले आहे. मेळाव्याच्या निमित्ताने चव्हाण यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. मेळाव्यास मोठय़ा संख्येने कार्यकत्रे उपस्थित राहावेत, अशी तयारी करण्यात आली आहे.
मेळाव्यात अशोक चव्हाण काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मेळाव्याला पक्षपातळीवरून कोणत्याही सूचना नाहीत. मराठवाडय़ातच नव्हे, तर राज्यात अशा प्रकारे प्रचंड खर्च करून स्वतंत्र मेळावा प्रथमच होत आहे. मेळाव्यानिमित्त शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. तीन लोकसभा मतदारसंघांतील हा मेळावा असला, तरी संयोजनात केवळ नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Story img Loader