१ जानेवारी २०१४च्या अर्हता दिनांकावर आधारित पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी निम्म्यापेक्षा अधिक मतदार एकटय़ा घनसावंगी तालुक्यातील आहेत.
जिल्हय़ातील १२ हजार २७४ नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. पैकी ६ हजार ६४८ घनसावंगी तालुक्यातील आहेत. हे प्रमाण ५४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. परतूर ७०१, जालना ५८१, बदनापूर ३ हजार १९६ आणि भोकरदन १ हजार १४८ अशी वगळलेल्या अन्य तालुक्यांतील मतदारांची संख्या आहे. जिल्हय़ात एकूण ८६ हजार १६४ मतदार वाढले. यात सर्वाधिक २० हजार ८१० मतदार बदनापूर तालुक्यातील आहेत. परतूर १३ हजार १४६, घनसावंगी २० हजार ३८८, जालना १३ हजार ७९९ व भोकरदन ८ हजार ४८२ अशी अन्य तालुक्यांत वाढलेल्या मतदारांची संख्या आहे.
अंतिम यादीतील मतदारांची संख्या १३ लाख २४ हजार ७१६ आहे. त्यात ७ लाख ३ हजार ८७९ पुरुष, तर ६ लाख २० हजार ८३७ महिला आहेत. जिल्हय़ात सर्वाधिक २ लाख ७५ हजार ७११ मतदार जालना तालुक्यात आहेत. महिला मतदारांची सर्वाधिक १ लाख ३० हजार १६७ संख्या घनसावंगी तालुक्यात आहे. अंतिम यादीतील छायाचित्र असणारे मतदार १२ लाख २९ हजार १८ असून अजून ९५ हजार ६९८ मतदारांची छायाचित्रे बाकी आहेत. छायाचित्र असणाऱ्या मतदारांचे जिल्हय़ातील प्रमाण ९२.७८ आहे. १२ लाख ३५ हजार ३०५ मतदारांकडे मतदान ओळखपत्रे असून, जिल्हय़ात अजून ८९ हजार ४११ मतदारांकडे ओळखपत्रे नाहीत. ओळखपत्र असणाऱ्या मतदारांचे जिल्हय़ातील हे प्रमाण ९३.२५ टक्के आहे. सर्वाधिक ९६.४४ टक्के ओळखपत्रे परतूर तालुक्यात असून सर्वात कमी प्रमाण जालना तालुक्यातील आहे.

Story img Loader