औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी १९ ऑगस्टला मतदान होणार असून, मतदानासाठी पात्र मतदारांची प्रारूप मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली.
मतदारांची प्रारूप यादी जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद/जालना, जिल्हा परिषद औरंगाबाद/जालना, महापालिका, छावणी परिषद औरंगाबाद, मुख्याधिकारी, नगरपरिषद पठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड (जिल्हा औरंगाबाद) तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद परतूर, अंबड, जालना, भोकरदन (जालना) या कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर डकविण्यात आली. या सर्व कार्यालयांच्या ठिकाणी प्रारूप मतदारयादी मतदारांच्या अवलोकनार्थ ठेवली आहे. प्रारूप मतदारयादीत (स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाचे नाव, स्त्री, पुरुष, एकूण या क्रमाने) नगरपरिषद कन्नड- १०, १२, २२, सिल्लोड- ८, १७, २५, भोकरदन- ९, १०, १९, खुलताबाद- १०, ९, १९, वैजापूर- ११, १२, २३, जालना- २७, ३१, ५८, गंगापूर- ९, १०, १९, पठण- १०, १२, २२, अंबड- ९, १०, १९, परतूर- ११, ९, २०. औरंगाबाद जिल्हा परिषद- ३४, २६, ६०, जालना- ३०, २५, ५५, महापालिका औरंगाबाद व छावणी परिषद- ३९, ७२, १११. एकूण स्त्री २१७ व पुरुष २५५. एकूण मतदार ४७२, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद यांनी कळविले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा