कडक  उन्हाळयात सर्व प्राणीमात्रांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते.   अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष्यांचे हाल होऊ नये म्हणून बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने पक्षी पाणवठय़ांचे वितरण करण्यात येत आहे. माणूस पिण्यासाठी पाणी मिळवू शकतो. मात्र पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशावेळी बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांच्या कल्पनेतून एक योजना मागील वर्षांपासून साकारण्यात येत आहे. त्यामुळे आता पक्ष्यांना पाण्याची आणि दाण्याची सोय होणार आहे.  पक्ष्यांसाठी पाणवठा तयार करताना त्यातच पाणी व दाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. घरी व झाडावर हा पाणवठा सहज टांगता येतो. हा पाणवठा तयार करण्यासाठी बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक सुधीर भालेराव यांनी कल्पकता वापरून विशेष  परिश्रम घेतले.