जपानी तंत्रज्ञानाने जलशुद्धीकरण करण्याचा पथदर्शी प्रकल्प बदलापूरमध्ये राबविण्यात येणार आहे. पॅसिफिक कन्सलटंट कंपनीचे काजशित्रो मिजर्ड, तात्स मॉरीमोटो यांनी अलीकडेच नगराध्यक्षा जयश्री भोईर, माजी उपनगराध्यक्ष कॅप्टन आशीष दामले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग आदींनी प्रकल्पस्थळास भेट दिली. बदलापूरमधील कात्रप आणि शिरगाव येथे चिखलोली नाल्याजवळ हा प्रकल्प होणार असून, त्यासाठी पालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. प्रकल्पाचा सर्व खर्च कंपनी करणार आहे. नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्ध करण्याचे हे जपानी तंत्रज्ञान सध्या जगात अनेक ठिकाणी अवलंबले जात आहे. इंडो-जपान सहकार्य करारानुसार राबविण्यात येणारा हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
आणखी वाचा