नाशिक एज्युकेशन सोसायटी व भारतीय जलसंस्कृती मंडळ यांच्या वतीने जलसाक्षरता अभियान मान्यवरांच्या उपस्थितीत राबविण्यात आले.जलसाक्षरता अभियानामुळे जल बचतीचे संस्कार बालवयातच विद्यार्थ्यांवर होतात व ते चिरकाल राहतात. सर्वानी पाणीबचतीच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन महापौर अॅड. यतिन वाघ यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असलेल्या पेठे विद्यालयातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी प्रा. दिलीप अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या ‘जल संस्कार’ या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक पी. एस. मुसळे, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते, नगरसेवक रुची कुंभारकर, संस्थेचे उपाध्यक्ष रमेश देशमुख आदी उपस्थित होते
पेठे विद्यालयात जलदिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक रा. गो. हिरे, उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, पर्यवेक्षिका जया कासार आदी उपस्थित होते.
यावेळी मोंढे यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रतिकृती व तक्ते तसेच पाण्यासंदर्भातील साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘जलविशेषांक २०१३’ या शालेय पुस्तिकेचे प्रकाशन व वितरण करण्यात आले. विशेषांकासाठी रफिक इनामदार, देवांग संतोष आणि एकनाथ कडाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थी व शिक्षकांनी पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या कविता, पथनाटय़ सादर केले. रश्मी सराफ यांनी सूत्रसंचालन केले. जया कासार यांनी आभार मानले.
सातपूर बचत गटातर्फे कार्यशाळा
जिजाऊ महिला सेवाभावी संस्था आणि सातपूर महिला बचत गटाच्या वतीने जलदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ संस्थेच्या अध्यक्षा नगरसेविका अश्विनी बोरस्ते होत्या. यानिमित्ताने जलसंवर्धनासाठी कार्यशाळा झाली. याअंतर्गत जिजाऊ जलसंवर्धन अभियानाची सुरुवात करण्यात आली.
महिला गटाच्या माध्यमातून जलसमितीद्वारे घराघरातून जलसंवर्धनाविषयी जागृती निर्माण करणे, शास्त्रोक्त पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करणे यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका, मेरी जिल्हा परिषद याची मदत घेण्यात येईल. तसेच उत्कृष्ट संदेश देणाऱ्या महिला बचत गटांना जिजाऊ जलसंवर्धन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा बोरस्ते यांनी केली. प्रज्ञा रणवीर यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा