मनमाडच्या नव्या अंतर्गत जलवाहिनीचे काम पुढील महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सभेत सांगितले.
सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, पथदीप यासह प्रभाग १ ते ७ मधील विविध विकास योजनांचा समावेश असलेल्या एकुण २० विषयांना अवघ्या ४० मिनिटांत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
नूतन नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतरची त्यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झालेली ही परिलीच सभा. सभेत शहरातील सध्याच्या विविध विषयांवर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये शहरातील सव्र्हे नं. १४२/९ मधील आ.क्र. ६० वरील बगीच्यासाठी असलेली ०.६७ आर पैकी जागा संपादीत करणे, नगरपरिषदेच्या आरक्षित व अनारक्षित भूखंडाचे बि.ओ.टी तत्वावर विकसन करणे, शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेबाबत उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपायांची अमंलबजावणी करणे,श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी सदनिका बांधण्यास मंजुरी, जिल्हास्तरीय नगरोत्धान योजना, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे तसेच प्रभाग १ ते ७ मधील विविध विकास कामांना मंजुरी मिळाली.
याशिवाय शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तसेच जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या गटारी यामुळे मलेरिया, डेंग्यु, टॉयफाईडसारख्या आजाराने डोके वर काढले असून १७-१८ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठय़ाने नागरिक त्रस्त आहेत.
विरोधी शिवसेना सदस्यांनी याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. राष्ट्रीय पुरूषांचे पूर्णाकृती पुतळ्यांचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्ष धात्रक यांनी दिली.
जलवाहिनीचे काम पुढील महिन्यात पूर्ण
मनमाडच्या नव्या अंतर्गत जलवाहिनीचे काम पुढील महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सभेत सांगितले.
First published on: 23-11-2013 at 07:06 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supplier work will complete in next month