सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील जल वाहिनीची गळती बंद करण्यासाठी बुधवारी दुरूस्ती काम करण्यात आल्याने सातपूर व नवीन नाशिकमधील काही भागात सायंकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. गुरूवारी सकाळी उपरोक्त भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.
अंबड लिंक रोडवरील पेट्रोल पंपाजवळ १२०० मि. मि. व्यासाच्या जलवाहिनीची गळती बंद करण्यासाठी सातपूर पाणी पुरवठा विभागाने बुधवारी दुरूस्तीची कामे केली. यामुळे सातपूर गाव, महादेववाडी, स्वारबाबानगर, अंबड लिंक रोड, टाऊनशीप, जाधव संकुल, म्हाडा वसाहत, संजीवनगर, वनविहार कॉलनी, गंगासागर, पारिजातनगर आदी भागात सायंकाळचा पाणी पुरवठा होऊ शकला नाही. तसेच नवीन नाशिकमधील राणेनगर, राजीवनगर, पांडवनगरी, प्रशांतनगर, आनंदनगर, कलानगर, उपेंद्रनगर, लक्ष्मीनगर, खुटवडनगर, गोविंदनगर, सदगुरूनगर, खांडेमळा आदी भागात दुपारी व सायंकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. गुरूवारी सकाळी उपरोक्त भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.

Story img Loader