शिंगणे कला महाविद्यालयाचा प्रेरणादायी उपक्रम
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढतच आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र भीषण पाणीटंचाई आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी गुराढोरांची हेळसांड होऊ नये, यासाठी साखरखेर्डा येथील भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाने ठिकठिकाणी पाण्याच्या हौदांची निर्मिती केली आहे. परिसरातील गुराढोरे या हौदांवर येऊन तहान भागवित आहेत.
या जिल्ह्य़ात सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. नदी, नाले, तलाव, प्रकल्प कोरडे पडले आहेत. दिवसागणिक भूगर्भातील पाणीपातळी खोल जात असल्यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना, तर घोटभर पाण्यासाठी जनावरांना कोसोदूर भटकावे लागत आहे. कुठून तरी पाणी आणून नागरिक गरज भागवत आहेत. परंतु, जनावरांसाठी कुठलीच सुविधा नसल्यामुळे त्यांची पाण्यासाठी प्रचंड होरपळ होत आहे. यासाठी डॉ.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सामाजिक दायित्वातून पुढाकार घेऊन लव्हाळा ते चिखली मार्गावर ठिकठिकाणी पाण्याच्या हौदांची निर्मिती केली आहे. एवढेच नव्हे, तर पेनटाकळी धरणावरून चिखलीकडे जाणाऱ्या जलवाहिनीवर व्हॉलवरील वाहून जाणारे पाणी टाक्यात साठवून ते जनावरांना पाजण्यात येत आहे. यावेळी व्हॉलवर शंभर लिटर्सच्या दोन टाक्या, तर महामार्गावर वीस टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. टाकीरूपी हौदांमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकनारी जनावरे या ठिकाणी येऊन आपली तहान भागवित आहेत. मुक्या जनावरांसाठी उपलब्ध करून दिलेली पाण्याची सुविधा उन्हाळ्यातच नव्हे, तर वर्षेभर सुरू राहणार असून त्यावर महाविद्यालयाचे लक्ष राहणार असल्याचे प्राचार्य डॉ.गावंडे यांनी सांगितले. या महाविद्यालयाने सुरू केलेल्या उपक्रमांचे पशुमालकांनी कौतुक केले आहे.