जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत बँक ऑफ बडोदाने जिल्हय़ातील ३ गावांसाठी ५ हजार लीटरच्या टाक्या दिल्या. जिल्हय़ात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी खासगी संस्था, बँकांना पाण्याच्या टाक्या देण्याचे आवाहन केले होते. बँक ऑफ बडोदाचे विभागीय प्रबंधक रजपूत, महाप्रबंधक मानवी यांनी प्रतिसाद देत ३ गावांसाठी प्रत्येकी २ अशा ५ हजार लीटरच्या टाक्या मंजूर केल्या.
या टाक्यांचे वितरण शाखाधिकारी नंदकुमार कांबळे व विशाल कंदी यांच्या हस्ते झाले. बाभळगावचे सरपंच दिगंबर लिंगायत, पिंपळा लोखंडे (तालुका पूर्णा) येथील सरपंच तुकाराम लोखंडे, चाटोरी (तालुका पालम) येथील सरपंच रामेश्वर किरडे यांच्याकडे या टाक्या सुपूर्द करण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water tank gifted by bank of badoda to drought affected villages
Show comments