लोकसभा निवडणुकीस अवकाश असला तरी जिल्हय़ाच्या विकासावर चर्चा व्हावी, यासाठी सर्वानी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगतानाच हिंगोलीची जागा राष्ट्रवादीकडे आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांचा निर्णय बंधनकारक असेल. त्यामुळे आपण आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव यांनी सांगितले.
नागपूर-हिंगोली-मुंबई रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत आमदार सातव यांना यश आल्याबद्दल जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्यामप्रकाश देवडा, तर प्रकाशचंद सोनी, रामजीभाई जोशी, सुभाष लदनिया, रमेशचंद बगडिया, मिलिंद यंबल, जेठानंद नैनवाणी आदींची उपस्थिती होती. आमदार सातव म्हणाले, की जिल्हय़ाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वानी एकत्र आले पाहिजे. हिंगोलीहून मुंबईस जाणारी रेल्वे आठवडय़ातून एकदा असणार आहे. सर्व संघटनांनी विकासकामांच्या प्रश्नावर आपल्या लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून त्यांना सोबत घेऊन जिल्हय़ाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. व्यापारी संघटनेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश आमदार सातव यांच्याकडे देण्यात आला. सातव यांनी आपले सहा महिन्यांचे मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदतीस देणार असल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा