काँग्रेसला बळकटी आणण्याकरिता युवकांना मजबूत करणे गरजेचे असून याकरिता युवक काँग्रेसला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले.
लोकसभा युवक काँग्रेस समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व युवक कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रभाकर मामलुकर, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुभाष धोटे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, देवराव भांडेकर, विनायक बांगडे, सुभाष गौर, प्रकाश मारकवार, के. के. सिंग, नंदू नागरकर, मतीन शेख, सुनिता लोढिया, हर्षल चिपळूणकर, विलास मेश्राम, अंबिका प्रसाद दवे उपस्थित होते. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी , युवक काँग्रेसकडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यात उत्कृष्ट कार्य होत असून समाजात आदर्शवत असणाऱ्यांचा पक्षाने नेहमीच गौरव करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी वरोरा येथील अनुप सरकार यांनी बारावीत ९४ टक्के गुण घेऊन जिल्ह्य़ातून प्रथम आल्याबद्दल त्याच्यासह विविध गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला

Story img Loader