दूध उत्पादक कर्मचाऱ्यांनी साथ दिल्यास ‘गोकुळ’ला पहिल्या क्रमांकावर नेऊ असा विश्वास ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी ९ लाख लिटर दूध संकलन कलश पूजन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. लवकरच ११ लाख लिटर प्रतिदिन दूध संकलनाचे उद्दीष्ट साध्य करू अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.    
कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ ) ९ लाख लिटर संकलनाचा टप्पा पार केला. यानिमित्त ज्येष्ठ संचालक आनंदराव पाटील-चुयेकर व जयश्री पाटील यांच्या हस्ते कलश पुजन करण्यात आले. यावेळीअध्यक्ष डोंगळे बोलत होते.     
राज्याच्या दूध संघांचे संकलन अजूनही चार लाख लिटरच आहे. असे असताना एका जिल्ह्य़ाचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘गोकुळ’ने ९ लाख लिटर संकलनाचा टप्पा पार केला आहे, असे नमूद करीत आनंदराव पाटील यांनी महानंद दूध संघावर टीका केली. शेतक ऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी शासन व दूध संघांनी एकत्र येवून दूध दरासंदर्भात विचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.    
कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी आभार मानले. १५०० लिटरपेक्षा जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचा, आजी-माजी संचालक, माजी कार्यकारी संचालक, सेवा निवृत्त अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यासह संचालक, दूध उत्पादक महिला उपस्थित होत्या.

Story img Loader