दूध उत्पादक कर्मचाऱ्यांनी साथ दिल्यास ‘गोकुळ’ला पहिल्या क्रमांकावर नेऊ असा विश्वास ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी ९ लाख लिटर दूध संकलन कलश पूजन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. लवकरच ११ लाख लिटर प्रतिदिन दूध संकलनाचे उद्दीष्ट साध्य करू अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ ) ९ लाख लिटर संकलनाचा टप्पा पार केला. यानिमित्त ज्येष्ठ संचालक आनंदराव पाटील-चुयेकर व जयश्री पाटील यांच्या हस्ते कलश पुजन करण्यात आले. यावेळीअध्यक्ष डोंगळे बोलत होते.
राज्याच्या दूध संघांचे संकलन अजूनही चार लाख लिटरच आहे. असे असताना एका जिल्ह्य़ाचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘गोकुळ’ने ९ लाख लिटर संकलनाचा टप्पा पार केला आहे, असे नमूद करीत आनंदराव पाटील यांनी महानंद दूध संघावर टीका केली. शेतक ऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी शासन व दूध संघांनी एकत्र येवून दूध दरासंदर्भात विचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी आभार मानले. १५०० लिटरपेक्षा जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचा, आजी-माजी संचालक, माजी कार्यकारी संचालक, सेवा निवृत्त अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अॅड. गोविंद पानसरे यांच्यासह संचालक, दूध उत्पादक महिला उपस्थित होत्या.
‘गोकुळ’ला पहिल्या क्रमांकावर नेऊ – डोंगळे
दूध उत्पादक कर्मचाऱ्यांनी साथ दिल्यास ‘गोकुळ’ला पहिल्या क्रमांकावर नेऊ असा विश्वास ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी ९ लाख लिटर दूध संकलन कलश पूजन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. लवकरच ११ लाख लिटर प्रतिदिन दूध संकलनाचे उद्दीष्ट साध्य करू अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-02-2013 at 08:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will take a lead for gokul on 1st rank dongale