आठव्या राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन २ डिसेंबरला लातूरमध्ये करण्यात आले आहे. मेळाव्यास दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अॅड. मा. गो. मांडुरके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महेंद्र भादेकर, सोपान वैद्य, श्रीरंग शेवाळे, तातेराव केसाळे गुरुजी या वेळी उपस्थित होते. धनगर समाजाच्या शिक्षित तरुणांमध्ये या मेळाव्याचे आकर्षण असून गतवर्षी १२०० जणांनी यात नोंद केली होती. नोंदणी नि:शुल्क, शिवाय निवास, भोजन आदी व्यवस्थाही नि:शुल्क आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सर्वागीण विकास मंडळाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले आहे. दि. २ डिसेंबरला मुक्ताई मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन केले असून उद्घाटन आमदार प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या हस्ते होणार आहे. मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच हुंडाबंदी व स्त्री भ्रूणहत्येवर प्रबोधनही केले जाणार असल्याचे मांडुरके यांनी सांगितले.
लातूरमध्ये धनगर समाज वधू-वर परिचय मेळावा
आठव्या राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन २ डिसेंबरला लातूरमध्ये करण्यात आले आहे. मेळाव्यास दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अॅड. मा. गो. मांडुरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. महेंद्र भादेकर, सोपान वैद्य, श्रीरंग शेवाळे, तातेराव केसाळे गुरुजी या वेळी उपस्थित होते. धनगर समाजाच्या शिक्षित तरुणांमध्ये या मेळाव्याचे आकर्षण असून गतवर्षी १२०० जणांनी यात नोंद केली होती.
आणखी वाचा
First published on: 09-11-2012 at 01:42 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weding intraction in latur of dhangar samaj