ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यामुळे देशभरात हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता.
‘प्रजासत्ताक दिन’ का साजरा केला जातो, असा प्रश्न मुंबई महापालिकेतील निवडक नगरसेवकांना विचारण्यात आला. या संदर्भात त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्याच शब्दांत झ्र्
शिवसेना
उदेश पाटेकर (प्रभाग क्रमांक ४)
मी बैठकीत व्यस्त आहे, थोडय़ा वेळाने फोन करून सांगतो.
सुनील गुजर (प्रभाग क्रमांक ३९)
लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य या घटनेला मान्यता मिळाली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो.
सुनीता इलावडेकर (प्रभाग क्रमांक ७२)
आता विभागात फेरी सुरू आहे, थोडय़ा वेळाने सांगते.
अश्विनी मते (प्रभाग क्रमांक १२३)
प्रजासत्ताकदिनी आपल्याला स्वातंत्र मिळाले.
यामिनी जाधव (प्रभाग क्रमांक २०७)
आपल्याला स्वातंत्र मिळाले, तरी आपल्या देशात आपला असा कायदा नव्हता, संविधान नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
काँग्रेस
सुषमा साळुंखे (प्रभाग क्रमांक २२५)
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य नेत्यांनी देशासाठी बलिदान केले. त्यानंतर आपली सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
सुनील मोरे (प्रभाग क्रमांक १९५)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य अंमलात आले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
केशरबेन मुरजी पटेल (प्रभाग क्रमांक ७३)
मै एक मिटिंग मे बैठी हू, आप मुरजी पटेलजीसे संपर्क करे, वोही बतायेंगे.
स्नेहा झगडे (प्रभाग क्रमांक १३०)
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र झाला. परंतु प्रत्यक्षात २६ जानेवारी रोजी स्वतंत्र्य मिळाले.
भाजप
बिना दोशी (प्रभाग क्रमांक १४)
इंग्रज भारत छोडकर गये, और हमारा देश आझाद हुवा. इसलिये ये दिन मनाया जाता हैं.
महेश पारकर (प्रभाग क्रमांक ८७)
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले असेल तरी खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य प्रजासत्ताक दिनापासून सुरू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला लोकशाहीचे अधिकार मिळाले. तसेच आपले सैनिकी सामथ्र्य लाभले.
मनसे
अनिषा माजगावकर (प्रभाग क्रमांक १०७)
या दिवशी भारताची घटना अंमलात आली. म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
वैष्णवी सरफरे (प्रभाग क्रमांक १०९)
नागरिकांना मूलभूत अधिकार देणाऱ्या घटनेची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेस
रत्ना महाले (प्रभाग क्रमांक १९२)
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी रोजी आपण लोकशाही स्वीकारली. म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
सुनील अहिर (प्रभाग क्रमांक १९३)
भारताचे संविधान या दिवशी तयार झाले. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा