अश्लील साहित्याचा उपभोग घेणे हा भारतीय दंड विधान वा माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही. ते इंटरनेटवरून घेण्यास वा डाऊनलोड करणेही गुन्हा ठरत नाही. याबाबत कायदा काय सांगतो.
सध्या कुठलाही गुन्हा घडला आणि तो करणारा विद्यार्थी वा तरुण असेल तर त्याचे सारे खापर इंटरनेटवर फोडले जाते. इंटरनेटच्या माध्यमातून सहजासहजी उपलब्ध होणारे अश्लील साहित्य, व्हिडीओ गेम्स याच्या उपभोगाचे आणि ते मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेण्याचे प्रमाण सध्या वाढले असून ती गंभीर समस्या बनली आहे. अश्लील साहित्याचा उपभोग घेणे हा भारतीय दंड विधान वा माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही. ते इंटरनेटवरून घेण्यास वा डाऊनलोड करणेही गुन्हा ठरत नाही.
जर एखादा तरुणाच्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ, गेम्स वा अॅप्लिकेशन्स असतील, तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. भारतीय दंड विधान संहिता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर वचक ठेवण्यासाठी करण्यात आलेला माहिती-तंत्रज्ञान कायदाच हे सांगतो. थ्रीजी टेक्नोलॉजीमुळे मोबाइल हा सध्या अश्लील साहित्य, व्हिडीओ, गेम्स अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करून घेण्याचे सहज माध्यम बनलेले आहे. कुणी काय पाहावे, काय नाही यावर कायदा नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र माहिती-तंत्रज्ञान कायद्याद्वारे थोडीफार बंधने घालण्यात आलेली आहेत. अश्लील साहित्याचा व्यक्तिगत उपभोगाऐवजी अन्यत्र उपयोग केला जात असल्याचे उघडकीस आले, तर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. अश्लील साहित्य प्रसिद्ध करण्यासोबतच ते इतरांना पाठविले तर त्याबाबत कारवाई केली जाऊ शकते. माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ नुसार अश्लील साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध वा वर्ग केले तर तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो. तर कलम ६७ (ए) नुसार, प्रसिद्ध करण्यात आलेले साहित्य हे लंगिक उत्कटता दाखविणारे असल्यास त्यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय कलम ६७ (ब) हे लहान मुलांसंदर्भातील अश्लील साहित्याच्या गुन्ह्यांबाबत असून त्यासाठीही पाच वर्षांची शिक्षा आहे. बरेच जण अश्लील साहित्य असलेले व्हिडीओ, गेम्स वा अॅप्लिकेशन्स इतरांना पाठवतात. असे करून या व्यक्ती आपल्या मोबाइलचा गरवापर करून इतरांच्या खासगी जीवनाचा भंग करत असतात. कलम ७७ (इ) नुसार, हेतुत: एखाद्याच्या गुप्तांगाची छायाचित्रे काढणे, ती प्रसिद्ध करणे वा वर्ग करणे हाही गुन्हा ठरविण्यात आला असून त्यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा ठेवण्यात आली आहे. माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार, अश्लील साहित्य घरी बसून वा स्वत:च्या मोबाइलवर पाहणे हा गुन्हा नाही, परंतु सायबर कॅफेमध्ये अश्लील साहित्य, गेम्स प्रसिद्ध करणे, डाऊनलोड करून घेण्यास पूर्णपणे मज्जाव आहे. कायद्याने व्यक्तिगत अधिकारांचे संरक्षण करण्याच्या हेतूने इंटरनेटवरून अश्लील साहित्य डाऊनलोड करणे, ते पाहणे, मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ ठेवणे हे गुन्हा ठरविलेले नसले तरी त्याचा दुरुपयोग टाळणे हे प्रत्येकाच्या हाती आहे. त्यामुळेच काय पाहायचे, काय नाही हे तुम्हीच ठरवा.
कायदा काय सांगतो..
अश्लील साहित्याचा उपभोग घेणे हा भारतीय दंड विधान वा माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही. ते इंटरनेटवरून घेण्यास वा डाऊनलोड करणेही गुन्हा ठरत नाही. याबाबत कायदा काय सांगतो.
आणखी वाचा
First published on: 25-12-2012 at 12:18 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What should law tell