विनोद, छायाचित्रे, बोधपर कथा यांच्यासारख्या मनोरंजनपर गोष्टींबरोबरच आता ‘व्हॉट्सअप’वर सामान्य व्यक्तींना उपयुक्त ठरतील अशा ‘टीप्स’ची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यात जेनेरिक औषधांविषयी सांगणाऱ्या अॅपच्या माहितीपासून सेलफोन हरवला तर तो ‘ईएमआय’ नंबरच्या मदतीने शोधायचा कसा इथपर्यंत अनेक लहानमोठय़ा गोष्टींची माहिती देणाऱ्या संदेशांचा उल्लेख करता येईल. या माहितीच्या उपयुक्ततेमुळे हे मेसेज सर्वसामान्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे त्यांची देवाणघेवाणही मोठय़ा प्रमाणावर होते आहे. एखाद्याचा चालक परवाना, शिधापत्रिका, बँकेचे पासबुक, पॅनकार्ड आदी महत्त्वपूर्ण दस्तावेज सापडले तर त्याच्या मालकापर्यंत पोहोचविण्यासाठी तो सरळ जवळच्या पोस्टबॉक्समध्ये टाका, अशी सर्वसाधारण माहितीत भर टाकणाऱ्या संदेशांची व्हॉट्सअपवरील देवाणघेवाण तर नित्याचीच झाली आहे. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या, स्वत: बांधलेल्या किल्ल्यांची छायाचित्रांसह माहिती देणारा मेसेज दोन आठवडाभरापूर्वी काही विशिष्ट ग्रूपवर सातत्याने फिरत होता. गडकिल्ल्यांच्या सामान्य माहितीत भर टाकणाऱ्या संदेशांबरोबरच गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या स्कॉलरशीप्स, अँजिओप्लॅस्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेन्टची खरी किंमत किती अशी अनेक प्रकारची माहिती व्हॉट्सअपवर सध्या फिरत असते.
व्हॉट्सअपच्या इतिहासात पहिल्यांदाच उपयोगाचा ‘मेसेज’ म्हणून विविध एअरलाइन्स कंपन्या, एबीएन अॅम्रोपासून सिंडिकेट बँक, महिंद्र, मारूती, टाटा आदी ऑटोमोबाईल कंपन्या, एमएमडी, अॅपल, डेल पासून झेनिथ आदी आयटी कंपन्यांचे टोल फ्री नंबर देणारा असा एक मेसेज असाच दोन आठवडय़ापूर्वी व्हॉट्सअपवर कमालीचा लोकप्रिय झाला होता. यात रेल्वे आरक्षण, कुरिअर कंपन्या, आयवा-सोनी, ब्लू स्टार, डिश टिव्ही आदी नाना घरगुती वापराच्या वस्तू बनविणाऱ्या कंपन्याचे टोल फ्री नंबरही देण्यात आले होते. या शिवाय मॉर्गन स्टॅन्ले, कोटक, एलआयसी आदी गुंतवणूक कंपन्या, ट्रॅव्हल कंपन्या, आरोग्यविषयक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या, विमा कंपन्या, सेलफोन कंपन्या, डीश टिव्ही पुरविणाऱ्या कंपन्या आदी नाना सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे टोल फ्री नंबरही समाविष्ट होते.
व्हॉट्सअॅपची ‘उपयुक्तता’ वाढली
विनोद, छायाचित्रे, बोधपर कथा यांच्यासारख्या मनोरंजनपर गोष्टींबरोबरच आता ‘व्हॉट्सअप’वर सामान्य व्यक्तींना उपयुक्त ठरतील अशा ‘टीप्स’ची देवाणघेवाण
First published on: 30-01-2014 at 07:49 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp usage grew