पालात राहणाऱ्यांकडे येथील व्यवस्था ‘माणूस’ म्हणून पाहणार आहे की नाही? असा सवाल समीक्षक प्रा. प्रल्हाद लुलेकर यांनी विचारला.
भटक्या-विमुक्तांच्या पिढय़ा न् पिढय़ा उपेक्षित जीवनाच्या भावना ‘मजल दरमजल’मध्ये प्रा. शिवाजी वाठोरो व एकनाथ खिल्लारे यांनी संपादित केल्या आहेत. या गौरवांकाचे विमोचन ‘मसाप’च्या सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश डोळस होते.
प्रा. लुलेकर म्हणाले, की संपूर्ण भटक्या जाती-जमातीच्या वेदना सारख्याच असल्या तरी त्यांना पोटजातींनी पुरते ग्रासले आहे. त्यांच्या चालीरीतींमध्ये अंतर असल्याने ते कधीच एकत्र येत नाहीत. शोषितांच्या वेदना वाढतच राहतात, हा इतिहास आहे.
अध्यक्षीय समारोपात प्रा. डोळस म्हणाले, की गौरवांकातील अभ्यासपूर्ण लेख वाचताना चळवळीचा पटच डोळय़ांसमोरून सरकत होता. गिऱ्हे दाम्पत्याचे ‘साहित्य भटक्यांतील पहिले साहित्य’ हा पहिलाच गौरवग्रंथ असावा, असेही त्यांनी सांगितले. मराठी सारस्वतात लक्ष्मीबाई टिळकांचे जे स्थान आहे, तेच भटक्यांच्या साहित्यात जनाबाईंचे आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. नवनाथ गोरे यांनी प्रास्ताविक केले, तर अमीनभाई जामगावकर यांनी आभार मानले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा