वेलीवर बहरलेल्या फुलांना बघून सर्वाचे मन आनंदाने भारावून जाते. वातावरणात सुगंध दरवळू लागतो. अनेक फुलांच्या रूपात वेगवेगळ्या छटा दिसतात, असे विचार नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांनी ‘वाईल्ड ब्लाझमस रेअर फ्लावर्स’ या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. ही पुस्तिका म्हणजे वेकोलितून सेवानिवृत्त झालेले छायाचित्रकार बाबुराव चिंगलवार यांच्या कल्पनेतून हे पुस्तक साकारलेले आहे.
ही पुस्तिका अग्रलेखाच्या स्वरूपात असून नागपूरकरांना यातून पर्यावरण सुरक्षा जागृतीचा संदेश मिळत असल्याने एक आदर्श ठरणारी आहे. आपल्या जीवनाची सुरुवात ही प्रत्येक दिवसाच्या सुंदर पहाटेपासून होत असते. निसर्गाच्या अप्रतिम छटा प्रत्येक दिवशी नव्या रूपाने पाहायला मिळतात. सकाळचे निर्मळ वातावरण जीवनात नवीन उत्साह निर्माण करते. याच उत्साहाने या पुस्तिकेतील फुलांच्या छायाचित्रांची मालिका तयार झाल्याचे चिंगलवार यांनी त्यांचे अनुभव व्यक्त करताना सांगितले. या मालिकेत अचल रूपात जंगली फुलांना चित्रित करण्याची प्रेरणा दिवंगत घनश्यामदास करवा यांची असून पुस्तिकेला साकार स्वरूप मे. अलताफ एच. वलीचे अनवरभाई यांच्या प्रेरणेने प्राप्त झाले आहे. ही पुस्तिका सीताबर्डीतील मे. अलताफ एच. वली येथे नि:शुल्क उपलब्ध आहे. यावेळी डॉ. बी.एल. भालचंद्र, शैलेश इजमुलवार, डॉ. सी.जी. आष्टीकर, निखिल चिंगलवार, अल्ताफ वली उपस्थित होते.

Story img Loader