वसरेवा-अंधेरी-घाटकोपर ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मेट्रो रेल्वे नेमकी कधी सुरू होणार याचा अधिकृत मुहूर्त अद्याप जाहीर झालेला नाही. मेट्रोच्या चाचण्या सुरू झाल्या असताना आता मेट्रोची स्थानकेही अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झाली आहे. प्रतीक्षा आहे ती प्रवाशांना घेण्यासाठी मेट्रो कधी येते याची. या स्थानकांचे वैशिष्टय़ म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत अवघ्या चार मिनिटांत संपूर्ण स्थानक रिकामे होईल अशी त्याची रचना आहे. वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या मेट्रो मार्गावर वसरेवा, डी. एन. नगर, आझाद नगर, अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकीनाका, सुभाष नगर, असल्फा रोड आणि घाटकोपर अशी १२ स्थानके आहेत. या मेट्रोमुळे घाटकोपर ते वसरेवा हे अंतर अवघ्या २१ मिनिटांत कापता येणार आहे. एरवी हे अंतर कापण्यासाठी सुमारे पाऊण तास लागतो. तर वाहतूक कोंडीमुळे बऱ्याचदा तब्बल दीड तास खर्ची पडतो.
‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर’ हा बहुचर्चित ‘मेट्रोवन’ प्रकल्प सुरू होण्याची आस मुंबईकरांना लागली आहे. मेट्रोचा हा मार्ग पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा असून घाटकोपर आणि अंधेरी ही दोन महत्त्वाची व अतिशय गर्दीची स्थानके जोडणारा आहे. पश्चिम तसेच मध्य रेल्वे प्रशासनाने मेट्रोमुळे वाढणाऱ्या प्रवाशांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू केली असली, तरी या दोन स्थानकांवर वाढणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जादा गाडय़ा वा १५ डबा गाडय़ांच्या वाढीव फेऱ्यांबाबत अद्याप कसलेही नियोजन झालेले नाही. परिणामी भविष्यकाळात मेट्रोमुळे वाढणाऱ्या रेल्वे प्रवाशांना भयानक गर्दीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विशेषत: घाटकोपर स्थानकावर गर्दीचा मोठा ताण पडण्याची शक्यता आहे.
आव्हान काय?
* मेट्रोमार्ग सुरू झाल्यानंतर सध्या अंधेरीवरून मुलुंडला जाण्यासाठी बेस्ट बसचा पर्याय निवडणारे अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत फसण्यापेक्षा मेट्रोने घाटकोपर स्थानक गाठून मुलुंडला जाणे पसंत करतील. हीच गोष्ट मुलुंड-अंधेरी किंवा ठाणे-अंधेरी प्रवास करणाऱ्यांबाबत होईल. सध्या मुलुंड किंवा ठाणे येथून अंधेरीला जाण्यासाठी अनेक जण प्रवासी बेस्टचा पर्याय निवडतात. पवई-साकीनाकामार्गे जाणारी ही बस वाहतूक कोंडीत अडकत असली, तरी रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी हा पर्याय निवडला जातो.
* साकीनाक्याला जाणारे अनेक जण कुल्र्याहून बसने जातात. जरीमरी-बैलबाजार अशा चिंचोळ्या रस्त्यावरून होणारा हा प्रवास अतिशय त्रासदायक आहे. सध्या या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. त्यामुळे कुल्र्याला उतरणारे अनेक जण घाटकोपरलाच उतरून मेट्रोने १२-१५ मिनिटांत साकीनाका गाठतील.
* पूर्व उपनगरांतून गोरेगाव किंवा मालाड येथे कामाला जाणारे लोक सध्या मध्य रेल्वेवर दादरला उतरून पश्चिम रेल्वेचा अवलंब करतात. पण मेट्रो सुरू झाल्यानंतर दादरऐवजी घाटकोपरला उतरून ते अंधेरी गाठतील आणि पुढील प्रवास करतील. परतीचा प्रवासही तसाच करतील. त्यामुळे अंधेरी आणि घाटकोपर या स्थानकांवरील प्रवाशांचा ताण वाढणार आहे.
* सध्या या दोन्ही स्थानकांमधून जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दी ओसंडून वाहत असते. आगामी काळात मेट्रोमुळे वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता सध्याच्या लोकलफेऱ्या अपुऱ्या ठरणार आहेत. मेट्रोने अंधेरी किंवा घाटकोपरला पोहोचलेल्या प्रवाशांना रेल्वेत चढताना या स्थानकांवर भीषण गर्दीचा सामना करावा लागला, तर या स्थानकांवर अपघातही होऊ शकतात. त्याचप्रमाणे या प्रवाशांना झटपट तिकीट मिळावे, याचीही सोय दोन्ही रेल्वे प्रशासनाला पाहावी लागणार आहे. या दोन्ही स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचा विचार करून प्रसाधनगृहे, स्वच्छतागृहे, स्टॉल्स आदी सुविधांचीही सोय रेल्वेला करावी लागेल.
मेट्रोचा ‘भार’ रेल्वेला पेलेल का?
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मेट्रो रेल्वे नेमकी कधी सुरू होणार याचा अधिकृत मुहूर्त अद्याप जाहीर झालेला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-12-2013 at 09:29 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will railway able to carry metro burden