सांगली जिह्यात उद्या मंगळवारपासून वीज खंडित झाली, तर वायरमन ऐवजी वायरवुमन सेवेला हजर होत आहेत. महावितरणाकडे यासाठी ४७ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता वायरमनच्या बरोबरीने महिला वायरवुमन काम करण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे कार्यालयात बसून काम करणाऱ्या महिला आता विद्युत खांबावर चढून जोखमीची कामे करण्यापासून ते वीज तोडण्यापर्यंतची सर्व कामे या महिला वायरवुमेन करणार आहेत, अशी माहिती महावितरण कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रमेश घोलप यांनी दिली.
महावितरणच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात ८० महिलांना वायरवुमेन म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन रमेश घोलप यांच्या हस्ते झाले; या वेळी ते बोलत होते. या वेळी घोलप पुढे म्हणाले की, वायरमन शब्द शहरी आणि ग्रामीण भागात तसा परिचयाचा आहे. अत्यंत जोखमीच्या आणि धोकादायक स्थितीत वायरमन काम करीत असतात. आता याच पद्धतीचे जोखमीचे काम महिला करणार आहेत. यासाठी महावितरणने सांगली जिल्’ाासाठी विविध कार्यालयात काम करणाऱ्या ४७ महिलांना याबाबतचे वायिरग आणि अन्य दैनंदिन कामकाजाचे प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये डांबावर चढून जोडणी व दुरुस्ती करणे, कनेक्शन डिसकनेक्ट करणे यासह गावागावात काम करणाऱ्या वायरमनला सहायक म्हणून सर्वती मदत या वायरवुमेन करणार आहेत. त्यामुळे पुरुषांबरोबर जोखमीचे काम करायला सांगलीच्या वायरवुमेन सज्ज झाल्या आहेत.
महावितरणच्या सांगली आणि कोल्हापूर विभागात एकूण साडेतीनशे महिला वायरवुमेन नियुक्त करण्यात आल्या आहेत. या महिला वायरवुमेनला प्रत्येकी एक गाव दिले जाणार आहे. या गावातील विजेच्या तक्रारी, तांत्रिक दुरुस्त्या आणि वसुलीचे कामही या महिला वायरवुमेन करणार आहेत. उद्यापासून या वायरवुमेन आपल्या नियुक्त ठिकाणी सेवा बजावणार आहेत. महिलांनी आता सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. यामध्ये महिलांनी कोणतेही क्षेत्र मागे ठेवले नाही. त्यामुळे आता वायरमनप्रमाणे महावितरणाच्या या रणरागिणी वायरवुमेन म्हणून गावागावात सेवा देणार आहेत.त्यामुळे अतिजोखमीची कामेही महिला करू शकतात हे या सांगलीच्या रणरागिणीनी दाखवून देतील. या वेळी सांगलीचे अधीक्षक अभियंता शिंदे उपअभियंता नीता शिंदे, प्रशिक्षण केंद्राचे उपअभियंता मुकुंद देशपांडे उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरास दहा परिमंडलातील महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा