तालुक्यातील थेरगाव परिसरात वादळी पावसामुळे विजेचे खांब व तारा जमिनीवर पडल्यानंतरही त्यातून विजेचा प्रवाह सुरूच राहिल्याने त्याच्या धक्क्याने शेतात कामासाठी गेलेल्या सुंदराबाई गोपीनाथ शिंदे या महिलेस आपला जीव गमवावा लागला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच या महिलेचा बळी गेल्याचा संताप गावात व्यक्त होत आहे.
थेरगाव परिसरात पावसाने पडलेले विजेचे खांब, तारा उचलून नेण्यात याव्यात म्हणून परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयास कळवले होते, मात्र महावितरणच्या कर्मचा-यांनी त्याची वेळीच दखल न घेतल्याने या महिलेला जीव गमवावा लागला. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुंदराबाई शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या असता जमिनीवर पडलेल्या तारांमधील वाहत्या विजेचा धक्का त्यांना बसला. त्यात त्या जागीच ठार झाल्या. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.
विजेच्या धक्क्याने महिला जागीच ठार
तालुक्यातील थेरगाव परिसरात वादळी पावसामुळे विजेचे खांब व तारा जमिनीवर पडल्यानंतरही त्यातून विजेचा प्रवाह सुरूच राहिल्याने त्याच्या धक्क्याने शेतात कामासाठी गेलेल्या सुंदराबाई गोपीनाथ शिंदे या महिलेस आपला जीव गमवावा लागला.
First published on: 17-09-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman died on the spot due to electric shock