पैशासाठी डॉक्टर पत्नीस वेळोवेळी अपमानित केले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, घरातून हाकलून देण्यात आले. या प्रकरणी पतीसह पाचजणांविरुद्ध शहरातील जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
डॉ. रूपा नीलेश संघवार (वय ३८, प्लॉट नं. ९ सव्‍‌र्हे नं. ६७/२, टिंगरेनगर, पुणे, हल्ली राहणार ज्ञानेश्वरनगर, गारखेडा, औरंगाबाद) या विवाहितेने फिर्याद दिली. दि. २३ नोव्हेंबर १९९९पासून ते २४ फेब्रुवारी २०१३पर्यंत पती नीलेश गजानन संघवार, सासरा गजानन नृसिंह संघवार, सासू शोभना गजानन संघवार, रूपा तुषार बॅनर्जी व संध्या प्रशांत येल्लूवार (सर्व टिंगरेनगर, पुणे) यांनी संगनमत करून वेळोवेळी अपमानित करून शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिले, तसेच नांदविण्यास घेऊन जाण्यासाठी २५ लाख घेऊन ये, अशी मागणी केल्याची फिर्याद आहे.

Story img Loader