भरधाव असलेला ट्रक रस्त्यांच्या खाली उतरून अंगणात सडा टाकत असलेल्या महिलेल्या धडकल्याने ती जागीच चिरडून ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी येथून जवळच किन्ही येथे घडली. या अपघातात अंगणात उभी असलेल्या दुचाकी व बलगाडीचाही चुराडा झाला.
संगीता दामोधर गायधने (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. परळी वैजनाथ (जि.बीड) येथून शालेय पोषण आहाराचे तेलाचे डबे घेऊन यवतमाळकडे येत असलेला आयशर ट्रकच्या (क्रमांक एम.एच.४४/८३०५) चालकाचे नियंत्रण सुटल्याने आर्णी रोडवरील किन्ही गावात राहत असलेली संगीताच्या अंगणात उतरला. ती पहाटे सडा टाकत असल्याने ट्रकखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला, तर अंगणात उभी असलेल्या दुचाकी तसेच बलगाडीचा चुरा झाला.
घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी धाव घेऊन ट्रकचालक मोतीराम चाटे (३५,रा.परळी) याला पकडून चोप दिला. संजय गायधने यांच्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2015 रोजी प्रकाशित
ट्रक अंगणात घुसल्याने महिला ठार
भरधाव असलेला ट्रक रस्त्यांच्या खाली उतरून अंगणात सडा टाकत असलेल्या महिलेल्या धडकल्याने ती जागीच चिरडून ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी
First published on: 20-01-2015 at 06:02 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wome dead