लग्नाचे आमिष दाखवून काळगावच्या युवतीवर बलात्कार केल्याबद्दल कराडच्या मंगळवार पेठेतील प्रकाश संभाजी फल्ले याच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. संबंधित युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ती तक्रार तालुका पोलीस ठाण्यात वर्ग झाली. लग्न का करत नाही, असे विचारल्यानंतर मारहाणही केल्याचे फिर्यादीत युवतीने म्हटले आहे. पोलिसांची माहिती अशी, की संबंधित युवती येथे तिच्या बहिणीकडे शिकण्यास राहात होती. त्या वेळी प्रकाश याच्याशी तिची ओळख झाली. त्या वेळी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर ती युवती तिच्या मनव येथील बहिणीकडे राहण्यास गेली. त्या वेळी प्रकाश घर सोडून तिच्याकडे मनवला राहण्यासाठी गेला. त्या वेळी माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी घर सोडून आलो आहे असे म्हणत त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार
लग्नाचे आमिष दाखवून काळगावच्या युवतीवर बलात्कार केल्याबद्दल कराडच्या मंगळवार पेठेतील प्रकाश संभाजी फल्ले याच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
First published on: 03-05-2013 at 01:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women raped in karad