पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत राज्य सरकारने स्थापन केलेल्या संघात मराठवाडय़ातील सहा महिला लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीत एकूण १८ महिला लोकप्रतिनिधी आहेत.पंचायत राज्य संस्थांमधील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींमध्ये लोकशाही तत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबत प्रशिक्षण देणे, तसेच त्यांच्या समस्या सोडविणे या उद्देशाने केंद्र सरकारच्या पंचायत राज्य मंत्रालयाने सन २००७ पासून पंचायत महिला शक्ती अभियान सुरू केले. अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पंचायत राज संस्थांमधील लोकनियुक्त महिला प्रतिनिधीचा संघ स्थापन करण्यात आला आहे.
मराठवाडा विभागातील नियुक्त सदस्यांची नावे – मीनाताई राऊत (परभणी जि. प. सदस्य), सिंधू नारायण जाधव (फुलंब्री पं. स. सदस्य), मुक्ता बरडे (बदनापूर पं. स. सदस्य), संगीता पतंगे (लातूर पं. स. सदस्य), विमल वानखेडे (सरपंच, पिंपळगावपेठ, तालुका भोकरदन), स्वाती कदम (सरपंच, वडवणा, तालुका व जिल्हा नांदेड).
संघात मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्ह्य़ातून एक महिला सरपंच, एक पंचायत समिती महिला सदस्य व एक जि. प. महिला सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नावे : औरंगाबाद – कल्पना सांगळे (पिंपळगावपेठ, तालुका सिल्लोड), सिंधू जाधव (पिशोर, तालुका कन्नड), अनुराधा चव्हाण (किनगाव, तालुका फुलंब्री), जालना – विमलताई वानखेडे (खडकी, तालुका भोकरदन), मुक्ता बर्डे (सायगाव, तालुका बदनापूर), वर्षांताई बेंदरे (सरफगव्हाण, तालुका घनसावंगी), परभणी – मीनाक्षी जाधव (अंबेगाव, तालुका मानवत), रुख्मिणीबाई सावंत (उखळी, तालुका सोनपेठ), मीनाताई राऊत (चारठाणा, तालुका जिंतूर), हिंगोली – अंबिका कुंदुर्ग (कबरदरी, तालुका सेनगाव), छाया गाजरे (शेवाळ, तालुका कळमनुरी), कांताबाई चट्टे (हट्टा, तालुका वसमत), बीड – संगीता मिसाळ (ठाकरमोहा, तालुका शिरुरकासार), भाग्यश्री खुळे (कोळपिंपरी, तालुका धारूर), उषा पवार (रामपुरा, तालुका गेवराई), नांदेड – स्वाती कदम (वडवणा, तालुका नांदेड), पल्लवी देशमुख (गोरठा, तालुका उमरी), विमलबाई नाईनवाड (लोहगाव, तालुका बिलोली), उस्मानाबाद – सुरेखा गुळदगड (पाटसावंगी, तालुका भूम), अरुणा करडे (वाशी, तालुका उस्मानाबाद), कांचनमाला संगवे (शिरढोण, तालुका कळंब), लातूर – मंगलबाई अंधारे (बाणवाडा, तालुका औसा), संगीता पतंगे (म्हाडा कॉलनी, लातूर), जयश्री पाटील (तालुका शिरूर अनंतपाळ).   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा