आपणास घरातून राजकीय वारसा लाभला असून महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन दिंडोरी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी येथे केले. येथील विश्रामगृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. पंकज भुजबळ होते. व्यासपीठावर आ. ए. टी. पवार, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, माजी आमदार नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी प्रास्तविकात पक्ष कार्याचा आढावा घेतला. यावेळी डॉ. पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या कार्याचे कौतुक केले. विकासाचा हा वेग यापुढेही कायम ठेवण्यासाठी सर्वानी एकत्रित काम करावे. मतभेद बाजूला ठेवावेत असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.आ. भुजबळ यांनी मनमाडच्या पाणीप्रश्नासह तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन अॅड. सुधाकर मोरे यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2014 रोजी प्रकाशित
महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे- डॉ. भारती पवार
आपणास घरातून राजकीय वारसा लाभला असून महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन दिंडोरी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी येथे केले.
First published on: 05-03-2014 at 10:32 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens should come forward in all sectors