जिल्हा परिषदेच्या पारनेर गटात सुमारे १ कोटी रुपये
खर्चाच्या पाच बंधाऱ्यांसह विविध विकास कामांना मंजुरी मिळाल्याची
माहिती कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे
यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही कामे होणार
आहेत.
मंजुरी मिळालेले साठवण बंधारे असे- आपधूप (१८ लाख ९ हजार रु.), करंदी (९ लाख रु.), सुपा (१३ लाख २७ हजार रु.), रायतळे (१२ लाख रु.) व बुगेवाडी (११ लाख १४ हजार रु.). अस्तगाव ते तरोडी या रस्त्यासाठी २० लाख रु. तसेच प्रत्येकी साडेचार लाख रुपये खर्चून थोरातवस्ती व थिटेवस्ती (वाळवणे), साकुरमळा (किणी), अण्णा पाटील मळा (रांजणगाव), लोणी रस्ता (हंगा), रायतळे गावठाण, रानवाडी व गावठाण (अस्तगाव) या ८ ठिकाणी अंगणवाडय़ांची इमारत उभारली जाणार आहे.    

Story img Loader