नाबार्डअंतर्गत वसई तालुक्यातील वसई, निर्मळ, आगाशी आदी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी व एक कोटी ७६ हजार ८८९ एवढी रक्कम मंजूर मिळूनही संथगतीने कामे सुरू असल्याने मंजूर झालेला निधी परत जाऊ नये म्हणून पावसाळ्यानंतर निधीचा विनियोग करण्याची मागणी वसई शहर काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुटर्य़ाडो यांनी केली आहे.
आतापर्यंत १६ लाख रुपयांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित रकमेची कामे रेंगाळली आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता अ. वि. नागपुरे यांची अलीकडेच भेट घेतली. नादे येथील भाऊसाहेब वर्तक शाळेजवळील गटाराचे काम, रस्त्यांची कामे डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन नागपुरे यांनी दिले.
‘अन्विती’ संस्थेतर्फे एकांकिका स्पर्धा
मुंबई- ‘अन्विती’ संस्थेतर्फे कै. प्रकाश नाईक यांच्या स्मरणार्थ २ डिसेंबर २०१२ रोजी दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी साठे महाविद्यालय, विलेपार्ले (पूर्व) येथे एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक रु. ५०००/- व सन्मानचिन्ह आणि द्वितीय क्रमांक रु. ३०००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी इच्छुक वैद्यकीय व्यावसायिकांनी मकरंद खानोलकर-९८२०५६९८२२ व कैवल्य ठाकूर-९८२०२२६१७५ यांच्याशी संपर्क साधावा.
मोडी लिपी प्रशिक्षणवर्ग
डोंबिवली येथील मोडी लिपी संवर्धन समितीतर्फे ठाणे व परेल येथे मोडी लिपी प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात येत आहेत. मोडी लिपीचा अभ्यास आणि मोडी लिपीची कॅलिग्राफी शिकण्यासाठी कलाप्रेमींनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा : (मो.)- ९६१९३९९४१५, ९८६९५४०९४३.
योग साधकांना प्रमाणपत्रे
श्री अंबिका योग कुटीर, ठाणे या योग क्षेत्रात काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेतर्फे सेंट रॉक्स हायस्कूल गोराई २, बोरिवली (प.) येथे योग वर्गाची सुरुवात ८ जुलै २०१२ पासून सुरू झाली होती. प्रथम त्रमासिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या साधकांचा प्रमाणपत्र सोहळा, ४ नोव्हेंबर २०१२ रोजी कुटिराचे सचिव रामचंद्र सुर्वे व मुंबईचे उपमहापौर मोहन मिठबावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अनेक साधकांनी आपल्या अनुभव कथनात योगाचे महत्त्व व त्यांना झालेले फायदे सांगितले. दुसऱ्या त्रमासिक वर्गाचे प्रवेश रविवार, १८ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी ६ वाजता वरील हायस्कूलमध्ये सुरू होतील.
जेट्टीचे काम सुरू होणार
पणजू येथील प्रवासी जेट्टीसाठी, तसेच निवारा शेड, थांबा व आसनव्यवस्थेसाठी सहा लाख ४६ हजार ५९५ रुपये एवढय़ा खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच जेट्टी दुरुस्ती व विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन मेरिटाइम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वसई शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मायकल फुटर्य़ाडो यांना दिले आहे.
जेट्टीच्या मुख्य कामासाठी सुमारे २२ लाख रुपये व शेड, आसन व्यवस्था आदी कामांसाठी सुमारे सात लाखांची मंजुरी मिळालेली आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी काँग्रेसने पाठपुरावा करूनही जून २०१२पर्यंत या कामाला सुरुवातही करण्यात आली नव्हती म्हणून पुन्हा १३ सप्टेंबर १२ रोजी मेरिटाइम अधिकाऱ्यांची फुटर्य़ाडो यांनी भेट घेतली. लवकरच हे काम हाती घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन बोर्डाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.
मीरा-भाईंदर पालिकेचे काही विभाग रामनगरात
मीरा-भाईंदर महापालिकेने मुख्यालयातील वजनदार खाती वगळता भांडार, परवाना, जाहिरात व वाहन विभागासह नगरभवनमधील शिक्षण विभाग मीरा रोड येथील रामनगर येथे स्थलांतरित करण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. एकाच पदावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा आदेश जाचक ठरणार आहे.
भाईंदर प. येथे पालिकेचे मुख्यालय आहे. तेथे पालिकेचे वेगवेगळे विभाग असून जवळच नगरभवन येथे शिक्षण व परिवहन विभाग आहेत. मॅक्समॉलमध्ये स्थानिक संस्था कराचे कार्यालय आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दोन-तीन विभागांचे काम पाहावे लागते. आता अचानक हे विभाग रामनगरात हलविण्याचे आदेश देण्यात आल्याने अधिकारी-कर्मचारी व जनतेचीही मोठी अडचण होणार आहे.
नाबार्डअंतर्गत मंजूर झालेली एक कोटीची कामे पूर्ण करण्याची मागणी
नाबार्डअंतर्गत वसई तालुक्यातील वसई, निर्मळ, आगाशी आदी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी व एक कोटी ७६ हजार ८८९ एवढी रक्कम मंजूर मिळूनही संथगतीने कामे सुरू असल्याने मंजूर झालेला निधी परत जाऊ नये म्हणून पावसाळ्यानंतर निधीचा विनियोग करण्याची मागणी वसई शहर काँग्रेसचे अध्यक्ष मायकल फुटर्य़ाडो यांनी केली आहे.
First published on: 16-11-2012 at 11:58 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of one crors should compitation fund passed under nabard