नाशिक-पेठ-कापरडा-पार्डी या रस्ता रूंदीकरणाचे भूमिपूजन मंगळवारी पालकमंत्री छगन भुजबळ, खा. समीर भुजबळ, माजी आमदार नरहरी झिरवाळ, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. भारती पवार आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पालकमंत्र्यांनी नाशिकची स्पर्धा पाश्चिमात्य देशांतील शहरांशी करताना आपले नाशिक सुंदर दिसण्याची गरज व्यक्त केली. नाशिकमध्ये विकासाला चांगलाच वाव आहे. त्यामुळे या शहराला अशा मोठय़ा रस्त्यांनी जोडणे आवश्यक आहे.
नाशिक-पेठ रस्त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील दळणवळण सोयीचे होऊन हा रस्ता शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी तसेच स्थानिक आदिवासींच्या विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. खा. भुजबळ यांनी  या रस्त्याच्या पहिल्या टप्यात ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. प्रास्तविकाता नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी आपण नेहमीच विकासाच्या पाठीमागे राहू असे आश्वासन दिले. कविता कर्डक यांनी आभार मानले.

Story img Loader