पगाराची रक्कम, भत्ता आणि दिवाळीनिमित्त रक्कम आगाऊ देण्यासंदर्भात वारंवार जाणीव करून दिल्यानंतरही कोणताच निर्णय न झाल्याने अखेर सोमवारी महापालिकेच्या ६०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
पालिकेच्या पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नसला तरी त्यांनी महापालिका कर्मचारी समन्वय समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
 आयुक्त दौलतखाँ पठाण, महापौर मंजुळा गावित यांनी संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरल्याने मंगळवारीही संप सुरूच राहील असा इशारा समन्वय समितीतर्फे देण्यात आला आहे.

Story img Loader