तालुक्याला नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी निळवंडे धरणाचे काम अनंत अडचणीतून मार्गी लागले आहे. दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी निळवंडय़ाखालील कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालु्नयातील मालुंजे, डिग्रस, आंभोरे, कोळवाडे परिसराचा थोरात यांनी काल दौरा केला. ठिकठिकाणी पाण्याच्या टा्नयांचे वितरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, दध संघाचे अध्यक्ष आर. बी.राहणे, रणजित देशमुख, गणपत सांगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना थोरात म्हणाले की, कालव्यांद्वारे कायमस्वरुपी पाणी मिळावे यासाठी निळवंडेच्या कामाला आपण सवरेच्य प्राधान्य दिले. येत्या काळात दोन्ही बाजुचे कालवे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून पाण्याचे नियोजन व काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. सहकारी संस्था व कारखान्याच्या माध्यमातून पाण्याच्या टा्नया, टँकर देण्यात येत असून परिस्थितीचा मुकाबला करण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. डॉ. तांबे, खेमनर, देशमुख आदींची यावेळी भाषणे झाली.

Story img Loader