वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, रोजगार वाढीसाठी विविध पर्याय खुले करून द्यावे, कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, आदी प्रलंबित मागण्यांसाठी कामगार संयुक्त कृती समिती व कामगार विकास मंचच्यावतीने शनिवारी सकाळी १० वाजता कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राणेनगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात हा मेळावा आहे.
कामगार प्रतिनिधी म्हणून काम करताना वेतन वाढत असले तरी महागाई नियंत्रणात आलेली नाही. यासाठी सरकारी धोरणात बदल तसेच कामगार हिताचे कायदे होणे गरजेचे आहे.
कामगारांनी आपल्या प्रश्नावर एकजुटीने लढा दिला, तर त्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागणार नाही. कामगार एकजुटीसाठी कामगार संयुक्त कृती समिती कार्यरत असून मेळाव्यात महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, कामगार कायद्याची अंमलबजावणी, सर्वाना समान निवृत्तिवेतनाची हमी आणि निवृत्तिवेतनाची रक्कम वाढवावी, बोनस व भविष्य निर्वाह निधीवरील मर्यादा उठवावी, ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढवावी, कायद्यात बदल करावे, किमान वेतनात वाढ, सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण बंद करावे, संघटित व असंघटित कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी आणि कंत्राटीकरण थांबवावे आदी मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे. कामगारांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयुक्त कृती समिती व कामगार विकास मंचने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा