एमआयडीसीतील बोल्हेगाव फाटय़ाजवळ टेम्पोची धडक बसून कामगाराचा मृत्यू झाला. ओमप्रकाश दशरथ सिंग (वय ३०, रेणुकानगर, बोल्हेगाव) असे त्याचे नाव आहे. काल रात्री हा अपघात झाला. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश हा क्लासिक व्हील्स कंपनीत कामाला होता. रात्री तो सायकलवरून औषध आणण्यासाठी जात असताना टेम्पोने (एमएच १७ के ११०५) धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला. जखमी ओमप्रकाशचा आज सकाळी औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Story img Loader