अनुरूप विवाह संस्था, अनुरूप परिवार आणि ‘लोकसत्ता’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘लग्नापूर्वीच हे शिकायला हवं’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विवाहेच्छुक युवक-युवतींना विविध चर्चासत्रांतून मार्गदर्शन करण्यात आले.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश गोखले यांनी त्यांच्या व्याख्यानात लग्नाचे आणि गर्भधारणेचे वय, गर्भनिरोधक गोळ्यांचे तोटे, आरोग्यपूर्ण आहार, लग्नापूर्वी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासण्या, पती आणि पत्नी यांच्या वयातील अंतर याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. शशांक सामक यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून लैंगिक शास्त्र समजावून दिले. तन्मय कानिटकर आणि अनुजा कोल्हटकर यांनी छोटय़ा प्रहसनातून ठरवून केलेल्या लग्नामध्ये पहिल्या दोन किंवा तीन भेटींमध्ये नेमके काय बोलावे याचे मार्गदर्शन केले. ‘अनुरूप’च्या संचालिका गौरी कानिटकर यांनी पती व पत्नी यांचे भावनिक नाते कसे फुलवायचे, नवीन नाती कशी समृद्ध करायची याविषयी माहिती दिली.
कार्यशाळेत अभिनेत्री समीरा गुजर-जोशी आणि त्यांचे पती अमेय जोशी यांची प्रकट मुलाखत झाली. तन्मय कानिटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा