सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व लोकमंगल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ व २८ एप्रिल रोजी शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी नगरातील ‘दि हेरिटेज’ मध्ये आयोजिलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या परगावच्या पत्रकारांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था संयोजकांकडून केली जाणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार व संपादकांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रासह तीन सत्रे होतील. तर दुसऱ्या दिवशीही तीन सत्रे होणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात (चार हुतात्मा पुतळ्यांमागे, पार्क जिमखाना इमारत, सोलापूर, दूरध्वनी-०२१७-२७२२९९९) नावनोंदणी करावी,असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर, सचिव राजकुमार सारोळे व लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्वर्यू सुभाष देशमुख व अविनाश महागावकर यांनी केले आहे.
सोलापुरात २७ व २८ रोजी पत्रकारांसाठी कार्यशाळा
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व लोकमंगल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ व २८ एप्रिल रोजी शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी नगरातील ‘दि हेरिटेज’ मध्ये आयोजिलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या परगावच्या पत्रकारांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था संयोजकांकडून केली जाणार आहे.
First published on: 11-04-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Workshop for journalist on 27 28th april held at solapur