सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व लोकमंगल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ व २८ एप्रिल रोजी शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी नगरातील ‘दि हेरिटेज’ मध्ये आयोजिलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या परगावच्या पत्रकारांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था संयोजकांकडून केली जाणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार व संपादकांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रासह तीन सत्रे होतील. तर दुसऱ्या दिवशीही तीन सत्रे होणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात (चार हुतात्मा पुतळ्यांमागे, पार्क जिमखाना इमारत, सोलापूर, दूरध्वनी-०२१७-२७२२९९९) नावनोंदणी करावी,असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर, सचिव राजकुमार सारोळे व लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्वर्यू सुभाष देशमुख व अविनाश महागावकर यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा