वस्तुसंग्रहालये हा त्या त्या देशाच्या जीवनात ऐतिहासिक वारसा आहे. वस्तुसंग्रहालयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रा. भालबा विभूते यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तार कार्य विभाग आणि राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तुसंग्रहालय व्यवस्थापन कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ शिक्षणशास्त्र सभागृह येथे आयोजित केली आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उदयसिंहराजे यादव म्हणाले, राष्ट्रीय महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराज, सिराज उद दौला, टिपू सुलतान अशा अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या वस्तू परदेशात आहेत. त्या परत आणणे गरजेचे बनले आहे.
डॉ. गोरखनाथ कांबळे यांनी विभागातील विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले. वसंत सिंघन यांनी आभार मानले. या वेळी अमृत पाटील, आदित्य मैंदर्गीकर, आर. एस. कुलकर्णी, प्रा. अरुण पाटील, एफ. एम. हुसेन आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा