स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याकरिता हुशारी व शहाणपणा यांचा योग्य संगम साधता आला पाहिजे. वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यासक्रमाची व्याप्ती समजावून घेऊन अभ्यास करावा, स्वप्नांशी तडजोड करू नका, असे प्रतिपादन डॉ. आनंद पाटील यांनी केले.
येथील स्टडी सर्कलतर्फे स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करण्याबाबत एकदिवसीय कार्यशाळा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, शिक्षण महामंडळाचे उपसंचालक राजेंद्र काळे, प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, वैशाली आनंद पाटील, प्रा. विजय बदखल उपस्थित  होते. प्रा. विजय बदखल, दीपक म्हैसेकर, डॉ. विजय आईंचवार यांचीही यावेळी भाषणे झाली. डॉ. आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
संचालन अनिल पेटकर यांनी तर आभार सिध्दमशेट्टीवार यांनी मानले. आयोजनाकरिता यशवंत डोये, चंद्रकांत पांडे, राकेश मत्ते, प्रफुल्ल मानकर, नितीन गोखरे, ठमके, सुषमा टाले यांनी सहकार्य केले.