सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लेझीम या खेळाचा विश्वविक्रम प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शिवाजी क्रीडांगणावर नोंदविण्यात आला. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्याचा बहुमान हजारो सांगलीकरांना लाभला.
सांगली शिक्षण संस्थेच्या ठिकठिकाणी असणा-या १८ शाळांतील ७ हजार २०० विद्यार्थ्यांनी लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक करून विश्वविक्रमाची नोंद केली. ७ मिनिटांच्या खेळाची नोंद या विक्रमासाठी ठेवण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी यासाठी उपस्थित होते.
महालेझीमचा कार्यक्रम शिवाजी स्टेडियमवर सकाळी ९ वाजता सुरू करण्यात आला. सांगली शिक्षण संस्थेच्या सांगली, तासगाव, विटा, लेंगरे आदी ठिकाणी असणा-या शाखांतील ७ हजार २०० विद्यार्थी महालेझीमच्या विक्रमासाठी उपस्थित होते. लेझीमचे चार डाव आणि तीन रचना अशा ७ मिनिटे चालणा-या प्रात्यक्षिकासाठी जूनपासूनच संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी प्रयत्नशील होते. हरिहर भिडे हे कार्यक्रम प्रमुख म्हणून कार्यरत होते.
——
१) फोटो – २७ एसएनजी १, फोटो – २७ सॅट १, ४, फोटो – २७ कोल २
लेझीम खेळाचा सांगलीत विश्व विक्रम
सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लेझीम या खेळाचा विश्वविक्रम प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शिवाजी क्रीडांगणावर नोंदविण्यात आला. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्याचा बहुमान हजारो सांगलीकरांना लाभला.
First published on: 28-01-2014 at 03:26 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World record of game of lazim in sangli