देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, तसेच रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्यात ३ लाख १ हजार एकाव्या साखर पोत्याचे पूजन आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाले.
जागृती शुगरच्या ३ लाख १ हजार एकाव्या साखर पोत्याचे पूजन संस्थापक आमदार देशमुख यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, मांजरा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या उपस्थितीत झाले. रेणा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, ‘रेणा’चे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, चांदपाशा इनामदार, लक्ष्मण मोरे, दिलीप माने, गणपत मोरगे, सूर्यकांत कर्वा, भगवान पाटील, तानाजी जाधव, अजित लोंढे, भगवान सावंत, कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
रेणा कारखान्यात ३ लाख १ हजार एकाव्या साखर पोत्याचे पूजन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख होते. कारखान्याचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक ए. आर. चव्हाण, अॅड. त्र्यंबक भिसे, सर्जेराव मोरे, विश्वास देशमुख, गणपत माने, अशोक पाटील, भगवान पाटील, शिवराज सप्ताळ, विश्वंभर कांबळे, पद्मजा देशमुख यांची उपस्थिती होती.
रेणा कारखान्याने १६ नोव्हेंबरला गाळप सुरू केले. मागील ५० दिवसांत कार्यक्षमतेचा सरासरी २१८ टक्के वापर करून १ लाख ४५ हजार ९८० मेट्रिक टन गाळप केले. यातून १०.४६ टक्के साखर उताऱ्यासह १ लाख ५३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. आमदार देशमुख यांच्या सूचनेनुसार १५ डिसेंबपर्यंत गाळपास आलेल्या सर्व उसाला प्रतिटन १८०० रुपये उचल देण्यात आल्याचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी सांगितले.