पनवेलच्या मातीतील कुस्तीवीरांसाठी चांगले दिवस आले असून रविवारी कामोठे नोडमधील सेक्टर ११ येथील सुषमा पाटील विद्यालयाच्या मैदानात दुपारी दोन वाजता निकाली कुस्ती सामन्यांचे आयोजन केले आहे. सिडको वसाहतीमध्ये पहिल्यांदाच कुस्तीचे सामने पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीबहाद्दर पेलवानाला दीड लाख रुपये रोख व चांदीची गदा देऊन गौरविणार असे आयोजकांनी जाहीर केले आहे. या महाकुस्तीच्या कुंभमेळ्यामुळे ग्रामीण पनवेलच्या कुस्तीवीरांना नवे व्यासपीठ मिळणार आहे.
यावेळी आमदार नरेंद्र पवार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या क्रीडा आघाडी, जय हनुमान कुस्ती संघ व रायगड जिल्हा कुस्ती असोशिएशन यांच्या संयुक्तिक ही स्पर्धा आयोजित केली आहे. कुस्तीच्या या महाकुंभामध्ये कर्नाटक केसरी पेहलवान अप्पा सरगर, हरियाणा केसरी पेहलवान सोनू कुमार, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे पेहलवान किरण भगत, दिल्ली येथील मोहिंदर सिंग आखाडय़ाचे पेहलवान राकेश कुमार, पेहलवान अरविंद शर्मा, हिंद केसरी आखाडाचे पेहलवान नीलेश लोखंडे, गोकुळ वस्ताद तालिम पुणेचे पेहलवान भारत मदने, किसन शेळके-मामासाहेब मोहोळ, कुस्ती केंद्र कात्रजचे पेहलवान अक्षय शिंदे, बारामती कुस्ती आखाडय़ाचे पेहलवान पृथ्वीराज भांडा, नवी मुंबई पोलिसांमधील पेहलवान अतुल जगताप, गणेश हिरगुडे, सह्य़ाद्रीय क्रीडा संकुलचे पेहलवान राहुल गायकवाड या नामवंतांसह १५० जण या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तरीही कुस्ती रसिकांनी या स्पर्धे ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा