कोणावर दोषारोप नाही-शिक्षणाधिकारी
याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, सर्व शिक्षा अभियानाच्या कामाबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या. त्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून गाढवे यांची नेमणूक केली होती. त्यांनी प्रत्येक शाळेत जाऊन चौकशी न करता सर्व मुख्याध्यापकांना प्रश्नावली देऊन एकाच ठिकाणी माहिती मिळवली व तसा अहवाल सादर केला. यात कोणावरही दोषारोप करण्यात आलेला नाही, असे शिक्षणाधिकारी व्ही.टी. गऱ्हाटे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्थानिक शिक्षण विभागाने शाळांमधील वर्गखोल्यांचे बांधकाम व खेळण्यांच्या वाटपातील गैरव्यवहाराचा शोध घेण्याकरिता तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची ४०-४५ प्रश्नांची लेखी परीक्षा घेऊन आणि विचित्र प्रश्न विचारून त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या अशोभनीय प्रकाराला जबाबदार शिक्षणाधिकारी व्ही.टी. गऱ्हाटे यांच्यावर आठ दिवसात कारवाई न केल्यास शिवसेना जिल्हा परिषदेला घेराव करेल, असा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशावरून शिक्षण विभागाने भंडारा तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना तोंडी सूचना देऊन १९ जानेवारीला येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात बोलवून घेतले. तेथे सर्व मुख्याध्यापकांकडून पेपर सोडवून घेण्यात आला. यात ४०-४५ प्रश्नांची लेखी उत्तरे देण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. वर्गखोली बांधकामाचे धनादेश काढण्यासाठी गटशिक्षणाधिकारी बी.आर.पारधी किंवा गटसमन्वयक पंचायत समितीने आपल्याकडून निधीची मागणी केली का? बांधकाम चालू असतांना पारधी यांनी आपल्याला धमकावून निधीची मागणी केली का? साहित्य खरेदी केले असल्यास ते चांगल्या दर्जाचे आहे का? हे साहित्य खरेदी करण्यास शाळा समितीची मान्यता आहे का? शिक्षक-प्रशिक्षणात पारधी हे शिक्षकांना अपशब्द बोलले का? शाळेच्या रेकॉर्ड ऑडिटसाठी आपल्याकडून निधीची मागणी करण्यात आली का?, असे अनेक प्रश्न विचारून त्याची उत्तरे मुख्याध्यापकांकडून लिहून घेण्यात आली होती.
भ्रष्टाचाराची चौकशी करावयाची आहे, तर समिती नेमून ती केली जावी. याला आमचा विरोध नाही, मात्र अशा प्रकारे जाहीररित्या परीक्षा घेऊन अपमानित करण्याचा प्रकार चुकीचा असून प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी असे करावयास नको होते. या प्रकरणात नाहक बदनामी केल्याबद्दल भुजाडे अब्रुनुकसानीचा दावा करणार आहेत, परंतु शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठ दिवसात शिक्षणाधिकारी गऱ्हाटे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवावा, अन्यथा शिवसेनेकडून जिल्हा परिषदेला घेराव करण्यात येईल, असा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकरांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे उपस्थित होते.