लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासामध्ये छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र बाळगण्यामध्ये रेल्वे प्रशासनाने थोडी सूट दिली असून आता शिधापत्रिकेची किंवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स सोबत असली तरी चालणार आहे. ही सूट १५ जानेवारीपासून मिळणार असून केवळ शयनयान आणि दुसऱ्या वर्गाच्या आरक्षणासाठीच असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १ डिसेंबरपासून आपल्या छायाचित्राचे ओळखपत्र सोबत बाळगणे रेल्वेने सक्तीचे केले होते. मात्र मूळ शिधापत्रिका किंवा राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक सोबत बाळगणे जिकीरीचे होत होते. त्यामुळे या दोन्हीची झेरॉक्स प्रत सोबत बाळगण्याची परवानगी मिळावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यामुळे रेल्वेने या दोन ओळखपत्रांच्या झेरॉक्स प्रती प्रवासादरम्यान बाळगण्यास परवानगी दिली आहे. मात्र या ओळखपत्रांवर राजपत्रित अधिकारी, मुख्य आरक्षण निरीक्षक किंवा स्थानक व्यवस्थापक/ प्रमुख यांची सही असणे आवश्यक आहे.
रेल्वे प्रवासात ओळखपत्राची झेरॉक्स चालणार
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासामध्ये छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र बाळगण्यामध्ये रेल्वे प्रशासनाने थोडी सूट दिली असून आता शिधापत्रिकेची किंवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स सोबत असली तरी चालणार आहे.
First published on: 12-01-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xerox copy of identity card is valid for railway journey