लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासामध्ये छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र बाळगण्यामध्ये रेल्वे प्रशासनाने थोडी सूट दिली असून आता शिधापत्रिकेची किंवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स सोबत असली तरी चालणार आहे. ही सूट १५ जानेवारीपासून मिळणार असून केवळ शयनयान आणि दुसऱ्या वर्गाच्या आरक्षणासाठीच असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १ डिसेंबरपासून आपल्या छायाचित्राचे ओळखपत्र सोबत बाळगणे रेल्वेने सक्तीचे केले होते. मात्र मूळ शिधापत्रिका किंवा राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक सोबत बाळगणे जिकीरीचे होत होते. त्यामुळे या दोन्हीची झेरॉक्स प्रत सोबत बाळगण्याची परवानगी मिळावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यामुळे रेल्वेने या दोन ओळखपत्रांच्या झेरॉक्स प्रती प्रवासादरम्यान बाळगण्यास परवानगी दिली आहे. मात्र या ओळखपत्रांवर राजपत्रित अधिकारी, मुख्य आरक्षण निरीक्षक किंवा स्थानक व्यवस्थापक/ प्रमुख यांची सही असणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा