यशवंतनगर व शहाबाग ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यशवंतनगर ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश आले, तर शहाबाग ग्रामपंचायत काँग्रेसने राष्ट्रवादीकडून हिरावून घेतली. शहाबागमध्ये काँग्रेस सहा व राष्ट्रवादी दोन असे संख्याबळ झाले असून एक जागा रिक्त आहे. तर यशवंतनगरमध्ये राष्ट्रवादी १३ व काँग्रेस २ असे संख्याबळ असून काँग्रेसला एक जागा चिठ्ठीमुळे मिळाली.
यशवंतनगर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून चालू सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत यशवंत ग्राम समृध्दी पॅनेल व राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत ग्राम विकास पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व नगरसेवक अनिल सावंत, नारायण जाधव, सुनील सावंत यांनी केले. तर, काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व विकास िशदे व पंढरीनाथ घाटे यांनी केले. यशवंतनगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रवर्गातून रुपाली निशिकांत डावळकर या विठ्ठल वॉर्ड क्रं. २ मधून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचीच सरपंचपदी वर्णी लागणार हे निश्चित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत यशवंत ग्रामसमृध्दी पॅनेलचे विजयी उमेदवार कंसात त्यांना पडलेली मते सोनजाई वॉर्ड क्र. १ मध्ये आनंदा दादा साठे (२९९), संजीवनी प्रकाश साठे (३१४), सदाशिव आप्पा कोळेकर (३६३), विठ्ठल वॉर्ड क्र. २ श्यामराव गुलाबराव गाडे (४०९), रुपाली निशिकांत डावलकर (३४२), धनश्री संतोष मोहिते (४०१), गणेश वॉर्ड क्र.३ माधुरी लक्ष्मण भोसले (२२६), आनंद शंकर चिरगुटे (२३६), दत्त वॉर्ड क्र. ४ संतोष आनंदराव संकपाळ (५३६), मदन दत्तात्रय सावंत (५३६), सौ. सीमा बाळासा मुसळे (५२३), बालाजी वॉर्ड क्र. ५ रामदास मारुती सावंत (२०२), सौ. संगीता अजय सावंत (१९७). राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार कंसात त्यांना पडलेली मते गणेश वॉर्ड क्र. ३ कौसल्या कुंडलीक घाटे (२५६), बालाजी वॉर्ड क्र. ५ विजया लक्ष्मण शेलार (१९०). राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा साळी व काँग्रेसच्या विजया शेलार यांना समान १९० मते पडल्याने विजया शेलार यांची चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली.
शहाबाग ग्रामपंचायतीची चार जागांसाठीची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल व राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत शहाबाग विकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची झाली. शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व शिवाजीराव जमदाडे, डॉ. अमर जमदाडे, तर शहाबाग विकास आघाडीचे नेतृत्व आनंदा जमदाडे, कैलास जमदाडे, लालसिंग जमदाडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार पराभूत झाल्याने शहाबाग ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. शहाबाग विकास आघाडीला सहा जागा मिळाल्या तर शेतकरी विकास पॅनेलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. शहाबाग विकास आघाडीतील संदीप सुरेश कोरडे हे भद्रेश्वर वॉर्ड व काळेश्वरी वॉर्डमध्ये दोन्ही ठिकाणी निवडून आले असून त्यांना अनुक्रमे २०२ व २१६ मते पडली आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत आघाडीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कंसात त्यांना पडलेली मते – भद्रेश्वर वॉर्ड क्र. 1 – सागर सुरेश जमदाडे (२०१), संदीप सुरेश कोरडे (२०२), काळेश्वरी वॉर्ड क्र. २ – संदीप सुरेश कोरडे (२१६), सौ. निर्मला लालसिंग जमदाडे (२२६).
शहाबाग ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुले असल्याने सरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असली तरी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते किसन वीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले विजयी उमेदवारांशी चर्चा करून सरपंचपदाची निवड करतील. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात गुलालाची उधळण करीत, फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषात आपला आनंद साजरा केला. तहसीलदार सुनील चंदनशिवे, निवासी नायब तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी एन. एस. भांदिग्रे, एम. एन. मिरकुटे, तलाठी धर्मराज ढमाळ, बी. टी. नेटके यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला.
यशवंतनगर राष्ट्रवादीने राखली, तर शाहबाग काँग्रेसच्या ताब्यात
यशवंतनगर व शहाबाग ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला यशवंतनगर ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश आले, तर शहाबाग ग्रामपंचायत काँग्रेसने राष्ट्रवादीकडून हिरावून घेतली.
First published on: 24-09-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwant nagar at ncp shahabaug is under control of congress