तालुक्यातील टाकळी (प्रवा) ग्रामपंचायतीने पंचायत सबलीकरणात नाशिक विभागात तृतीय तर जळगाव जिल्ह्य़ात प्रथम क्रमांक मिळविला आहे. ‘यशवंत पंचायतराज’ तथा पंचायत सबलीकरण उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या कामाच्या मूल्यमापनाची समितीमार्फत पडताळणी झाली. पारितोषिकाचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि रोख एक लाख रुपये असे आहे. यशवंत ग्रामसमृद्धी योजनेचे पारितोषिकही ग्रामपंचायतीला मिळाले आहे.
नाशिक विभागातील ग्रामपंचायतींच्या कामांच्या मूल्यमापनासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष बुलढाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जेथे होते. समिती सदस्यांनी टाकळीचे सरपंच किसनराव जोर्वेकर यांच्या नेतृत्वाखाली  झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले. तीन फेब्रुवारी रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिरात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना गौरविण्यात येणार आहे.
समितीने ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करताना विविध विकास कामांबरोबरच महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, ग्राम दप्तर नियोजन व व्यवस्थापन, ग्रामसभांचे आयोजन, तंटामुक्त समित्यांचे कामकाज या सर्वाचे मूल्यमापन केले. ई संगणकीकरण कामात टाकळी ग्रामपंचायत जिल्ह्य़ात अग्रेसर असल्याबाबत समितीने समाधान व्यक्त केले.
यापूर्वीही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय प्रथम पाच लाखांचे बक्षीस, तंटामुक्त अभियान, ग्रामसभा, हागणदारीमुक्त अभियानाचेही पहिले बक्षीस या ग्रामपंचायतीला मिळाले आहे. याशिवाय बेटी बचाव अभियान, थकबाकी वसुली या महत्त्वपूर्ण कामांबद्दल जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले आहे. या सर्व कामांचे श्रेय सरपंच जोर्वेकर यांनी ग्रामसेवक के. डी. पाटील  यांच्यासह   ग्रामपंचायत सदस्यांना दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwant panchayatraj project