यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार-२०१४ चा वितरण सोहळा यंदा बदलापूरमध्ये होणार आहे. या पुरस्कारासाठी इच्छुकांनी १ डिसेंबरपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन नव महाराष्ट्र युवा अभियानाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि नव महाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांचा युवा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. दोन्ही प्रकारात युवा व युवती असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे यंदा १५ वे वर्ष असून २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे स्वरूप आहे. ३१ डिसेंबर २०१३ रोजी ३५ वर्षांच्या आत असणारे युवक या पुरस्कारासाठी पात्र ठरतील. पुरस्काराचे अर्ज ‘नवमहाराष्ट्र डॉट ओआरजी’ तसेच सुप्रिया सुळे डॉटकॉम या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. १८ जानेवारी २०१४ रोजी बदलापूरमधील मराठी शाळेच्या मैदानावर पुरस्कार वितरण सोहळा होईल, असे निमंत्रक कॅ.आशीष दामले यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क, प्रवीण देशमुख-९९७०५०३४८०, डॉ. सचिन पानसरे-८००७१४५५५५.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा