यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीला समाजसेवेचा खरा आदर्श असून, त्यांचे विचार देशाला तारणारे आहेत. संरक्षण मंत्रिपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठय़ा अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची निर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राष्ट्र विकासासाठी आजही प्रेरणादयी ठरला असल्याचा गुणगौरव करताना, यशवंतरावांच्या साहित्य प्रेमाचे अनुकरण आजच्या विद्यार्थ्यांनी करावे अशी अपेक्षा निवृत्त नौसेना अधिकारी विनायकराव अभ्यंकर यांनी व्यक्त केली.
शिक्षण मंडळ कराडच्या यशवंत व्यासपीठांतर्गत आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व व कथाकथन स्पध्रेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी होते. उपाध्यक्ष ल. रा. जाखलेकर, सचिव डॉ. रा. गो. प्रभुणे, सहसचिव डॉ. एस. जी. सबनीस, अतिरिक्त सहसचिव मकरंद महाजन, संचालक हरिभाऊ घळसासी, बापूसाहेब चिवटे, सौ. अनघा परांडकर, कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, मुख्याध्यापक जी. जी. अहिरे मुख्याध्यापिका मंजिरी ढवळे यांची या वेळी उपस्थिती होती.
विनायक अभ्यंकर म्हणाले, की यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री नसते तर भारत-चीन युद्धावेळी देशाचे काय झाले असते याचा विचार करूच नये अशी वेळ आली असती. निधडय़ा छातीच्या या महाराष्ट्राच्या सह्याद्रीने देशरक्षणासाठी छातीचा कोट केला आणि आपल्यावरील भयंकर संकट टळले. सैनिकांचे मनोधर्य वाढविण्यासाठी, त्यांनी तमाशा, लोकगीते व पोवाडय़ांचे आयोजन केले व आपल्या कलाप्रेमाचा आविष्कार सिद्ध केला. यशवंतरावामुळेच युद्धनीतीला; पर्यायाने देशाला खरे स्वरूप प्राप्त झाले. यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते तर खरे समाजकारणी होते. राज्याचा व देशाचा डोलारा सांभाळताना धावपळीच्या काळातही त्यांनी साहित्यातील व्यासंग कायम ठेवला. म्हणूनच यशवंतराव देशाच्या राजकारणात पट्टीचे व्याख्याते बनले.
प्रास्ताविक मुकुंदराव कुलकर्णी यांनी केले. तर डॉ. रा. गो. प्रभुणे, विनायक पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यशवंतरावांचे विचार राष्ट्र विकासास आजही प्रेरणादायी – अभ्यंकर
यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीला समाजसेवेचा खरा आदर्श असून, त्यांचे विचार देशाला तारणारे आहेत. संरक्षण मंत्रिपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठय़ा अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची निर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राष्ट्र विकासासाठी आजही प्रेरणादयी ठरला असल्याचा गुणगौरव करताना, यशवंतरावांच्या साहित्य प्रेमाचे अनुकरण आजच्या विद्यार्थ्यांनी करावे अशी अपेक्षा निवृत्त नौसेना अधिकारी विनायकराव अभ्यंकर यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा
First published on: 05-12-2012 at 08:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwantrao chavans thoughts motivational for nation development abhyankar